कारंजा तालुक्यातील दिघी सोमठाणा परिसरात बिबट्याच्या हालचालीमुळे भीतीचे सावट पसरले आहे. दिघी येथील दिगंबर कानडे व प्रमाद ढळे या दोघांना सोमठाणा घाटात बिबट्याचे प्रत्यक्ष दर्शन झाल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या घटनेने या परिसरातील नागरिक आणि विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातवरण निर्माण झाल्याची माहिती दि. 25 नोव्हेंबर रोजी मिळाली आहे.