लोहारा: उसने पैसे परत दे', म्हणत दोघा भावांना काठीने मारहाण; सास्तुर येथील घटना
लोहारा तालुक्यातील सास्तुर येथे उधारीचे पैसे परत करण्याच्या कारणावरून दोन भावांना शिवीगाळ करून काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. ही घटना सास्तुर येथील शिवाजी चौकातील एका इडली सेंटरवर घडली. याप्रकरणी दोन आरोपींविरोधात लोहारा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी शरण श्रीशैल्य नरुणे (वय २६, रा. सास्तुर) यांनी फिर्याद दिली आहे. अशी माहिती लोहारा पोलिसांच्या वतीने चार ऑगस्ट रोजी सहा वाजता देण्यात आली.