पाचोरा: भडगांव उपनगराध्यक्षपदी पाणीवाले बाबा राजेंद्र पाटील यांची वर्णी | विकास कामांना वेग येणार, दिली माहिती,
भडगाव नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने मिळवलेल्या दणदणीत विजयानंतर आता शहराच्या विकासकामांना गती देण्यासाठी प्रशासकीय अनुभवी नेतृत्वाकडे महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी रेखाताई प्रदीप मालचे यांच्या निवडीनंतर, आता उपनगराध्यक्षपदासाठी माजी नगराध्यक्ष राजेंद्र महादू पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची वर्णी लागली आहे. तर आतापर्यंत पाणीच्या माध्यमातून जनतेची सेवा केली असून पुढेही अविरत सेवा विविध माध्यमातून सुरूच राहील असे पसांगितले,