नागपूर महानगरपालिकेने आर्थिक वर्ष २०२६-२७ साठी ५,८५७.३० कोटी रुपयांचे अंदाजित बजेट स्थायी समितीकडे सादर केले आहे. या बजेटमध्ये शहराच्या सर्वांगीण विकासावर आणि महानगरपालिकेची आर्थिक स्थिती सुधारण्यावर विशेष भर देण्यात आला आhe .नागपूर महानगरपालिकेचे हे ७५ वे वर्ष असून, त्यानिमित्त ७५ मैदाने आणि ७५ उद्याने विकसित करण्याचा संकल्प करण्यात आला आहे.