वडवणी: कवडगाव येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुंडे कुटुंबाची घेतली भेट
Wadwani, Beed | Oct 28, 2025 फलटण येथे झालेल्या अत्याचारानंतर मृत्यू झालेल्या डॉ. संपदा मुंडे यांच्या कुटुंबीयांची ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मंगळवार दि 28 ऑक्टोबर रोजी रात्री 7 वाजता भेट घेतली. ते वडवणी तालुक्यातील कवडगाव येथील त्यांच्या निवासस्थानी गेले. या भेटीदरम्यान लक्ष्मण हाके यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. तसेच, डॉ. संपदा मुंडे यांना न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.