वैजापूर: बोर दहेगाव येथे श्री स्वामी समर्थ महाराज पालखी सोहळा उत्साहात संपन्न
परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने व आदेशाने तसेच मार्गदर्शनाने श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आयोजन स्वामी समर्थ ग्राम अभियान विभाग अंतर्गत वैजापूर तालुक्यातील बोर दहेगाव येथे भव्य दिव्य पालखी सोहळ्याचे आयोजन रविवार रोजी करण्यात आले होते. आज पर्यंत सेवा केंद्रा मार्फत ११६ गावात पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्याच प्रमाणे ११७वा भव्य दिव्य पालखी सोहळा बोर दहेगाव येथील सेवा केंद्राच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.