नियमित ठाणेदार सुभाष बारसे यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध रेती तस्करीवर त्वरित कारवाई करण्यात आली आहे. १६ डिसेंबर रोजी सकाळी साडे ९ वाजताच्या सुमारास धाबेटेकडी शिवार येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी उमेश अशोक गभणे (वय ३२, रा. गुरढा) हा त्याच्या मालकीचा व ताब्यातील स्वराज कंपनीचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर आणि त्याला जोडलेली विना क्रमांकाची लाल रंगाची ट्रॉली यांमध्ये अंदाजे १ ब्रास रेती विनापास-परवाना नदीघाटातून चोरी करून शासनाचा महसूल बुडवताना आणि पर्यावरणाची हानी करताना आढळून आला.