कन्नड: शेतकऱ्यांनी तातडीने ‘फार्मर आयडी कार्ड’ काढावे; अन्यथा नुकसानभरपाईत अडचण – शेतकरी मित्र बापू गवळी
शेतकऱ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ‘फार्मर आयडी कार्ड’ आवश्यक असल्याचे बापू गवळी यांनी सांगितले.त्यांनी सर्व शेतकरी बांधवांना तातडीने हे कार्ड काढून घेण्याचे आवाहन केले आहे.अन्यथा आपत्तीग्रस्त नुकसानभरपाई मिळविताना अडचणी निर्माण होऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.यासाठी कृषी विभागाकडून आवश्यक सहकार्य घ्यावे, असे आवाहन त्यांनी केले.