राहाता: शिर्डी संस्थानच्या वीज साहित्य घोटाळा 47 आरोपींवर गुन्हा दाखल....!
शिर्डीतील श्री साईबाबा संस्थानच्या विद्युत विभागात तब्बल ७७ लाख रुपयांचा विज साहित्य अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणात ४७ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी या घोटाळ्याबाबत उच्च न्यायालयात क्रिमिनल रिट दाखल केली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. लेखापरीक्षणात बनावट नोंदी, साहित्य गायब आणि गैरव्यवहार उघड झाल्यानं साई संस्थानच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्मा