घाटंजी: ताडसावळी येथे एकास लाकडी काठीने मारहाण,आरोपी विरुद्ध पारवा पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी सावित्रा महादेव मडावी यांच्या तक्रारीनुसार 17 ऑक्टोबरला आरोपी राजेश उईके यांनी चार महिन्यापूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून जुन्या भांडणाच्या कारणातून फिर्यादी सोबत वाद करून शिवीगाळ केली. तसेच लाकडी काठीने मारहाण करून जखमी केले व जिवे मारण्याची धमकी दिली.याप्रकरणी 17 ऑक्टोबरला पारवा पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.