पवनी: प्रेमसंबंधांसाठी मैत्रिणीवर दबाव, पोक्सोअंतर्गत ३ अल्पवयीनांवर पवनी पोलीसांत गुन्हे दाखल ; चौघेही होते वर्गमित्र
Pauni, Bhandara | Sep 16, 2025 पवनी येथील दोन अल्पवयीन मुलगे आणि एका अल्पवयीन मुलीविरुद्ध मैत्रिणीला बळजबरीने प्रेमसंबंधात अडकविण्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून पोक्सो कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनाक्रमात अवघ्या १७ वर्षे वयातील २ मुलेगे आणि २ मुलींचा समावेश आहे. ते चौघेही आधीपासूनच वर्गमित्र होते. पुढे त्यामधील दोघांची दहावीनंतर शाळा बदलली. मात्र बारावीत शिकवणी वर्ग एकच असल्याने त्यांचा संपर्क कायमच राहिला. अशातच, २ मुलांपैकी एकाचे एका मुलीकडे आकर्षण वाढले.