धरणगाव: सराय मोहल्ला परिसरात इराणच्या माय-लेकाला आश्रय देणाऱ्या दोघांना अटक; धरणगाव पोलीसात गुन्हा दाखल
धरणगाव शहरातील सराय मोहल्ला परिसरातून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. इराण देशातील एका महिलेला आणि तिच्या तीन वर्षांच्या मुलाला विनापरवानगी आणि व्हिजाची मुदत संपलेली असतानाही आश्रय दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरूवार ८ जानेवारी रोजी सायंकाळी ५ वाजता धरणगाव पोलिसांनी दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे.