कोपरगाव: शहरातील साईप्रभानगर येथे घरफोडी प्रकरण उघडकीस ; चार चोरट्यांना शहर पोलिसांनी गजाआड
कोपरगाव शहरातील साईप्रभानगर येथे राहणाऱ्या वंदना दिनेश पवार यांच्या घरात चार अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने प्रवेश करून मारहाण करत सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण १लाख ५१,७७७ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. ही घरफोडी उघड झाली असून याप्रकरणीमुख्य आरोपी प्रसाद भारत पांडव (वय २५, रा. वेरुळ, ता. खुलताबाद, जि. संभाजीनगर) यास ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपल्या साथीदारांची नावे उघड केली त्यात आशिष राजाराम भोसले (वय १९, रा. अहिल्यानगर) ऋषिकेश नवनाथ धाकतोडे (वय २३, रा. नेवासा) असे आह