राहुरी तालुक्यातील केंदळ खुर्द परिसरात एका ४७ वर्षीय महिलेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी आरोपी हरिभाऊ साहेबराव जाधव (रा. केंदळ खुर्द, ता. राहुरी) याच्या विरोधामध्ये राहुरी पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.