संगमनेर: संगमनेरमध्ये बिबट्यांचा वाढता उच्छाद! शेतकऱ्यांमध्ये भीतीचं सावट — जनावरांनंतर आता माणसांवर हल्ल्याची भीती
संगमनेरमध्ये बिबट्यांचा वाढता उच्छाद! शेतकऱ्यांमध्ये भीतीचं सावट — जनावरांनंतर आता माणसांवर हल्ल्याची भीती बातमी : संगमनेर तालुक्यासह शहर परिसरात बिबट्यांचा वावर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ग्रामीण भागात तर दिवसाढवळ्या बिबट्यांचे दर्शन घडत असून, शेतकऱ्यांना शेतामध्ये जाण्याचीही भीती वाटू लागली आहे. गेल्या काही दिवसांत अनेक जनावरे, तसेच कुत्र्यांवर हल्ले झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.