मंद्रूप पंचायत समिती गणातील भाजपचे उमेदवार मळसिद्ध मुगळे यांनी कार्यकर्ते व मतदारांना शांतचित्ताने, कोणताही द्वेषभाव न ठेवता मतदान प्रक्रिया पार पाडण्याचे आवाहन केले. आपल्या सोबत लाडकी बहीण योजना आणि लाडका भाऊ योजना या दोन्ही असल्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, असेही त्यांनी यावेळी ठामपणे सांगितले. यावेळी मंद्रूप जिल्हा परिषद गटातील उमेदवार सोनाली प्रशांत कडते याही उपस्थित होत्या. ते म्हणाले की, मागील तीन वर्षांच्या कालावधीत विरोधकांनी कोणतीही ठोस विकासकामे केली नाहीत. उलट समाजात जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केल्याचे ते म्हणाले.