शिरपूर: शहरातील दूध डेअरी कॉलनीत गॅस गळतीमुळे घराला आग,अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला
Shirpur, Dhule | Oct 18, 2025 शिरपूर शहरातील दूध डेअरी कॉलनी परिसरात महादेव मंदिराजवळ एका घरात 18 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी सुमारास दोन वाजेच्या सुमारास गॅस गळतीमुळे अचानक आग लागली. या भीषण आगीत स्वयंपाकघरासह घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले असून,सुदैवाने अग्निशमन दलाच्या सतर्कतेमुळे पुढील नुकसान व जीवितहानी टळली आहे.