कोपरगाव: कोळपेवाडी येथे कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर कर्मवीर कृषी महोत्सवाचे कृषिमंत्री ना. भरणे यांच्या हस्ते उद्घघाटन
कर्मवीर शंकरराव काळे यांच्या 13 व्या पुण्यस्मरणानिमित्त कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कर्मवीर शंकरराव काळे मित्रमंडळ आयोजित 'कर्मवीर कृषी महोत्सव 2025' चे उदघाटन आज 7 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता कोपळपेवाडी येथे राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते व माजी आमदार अशोक काळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी आ.आशुतोष काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष अशोक कानडे, द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष कैलासराव भोसले व मान्यवर उपस्थित होते.