गोरेगाव: शहीद जाण्या तिम्या जिल्हा परिषद हायस्कुल व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव वंदे भारत कार्यक्रमाचे आयोजन
शहीद जाण्या तिम्या जिल्हा परिषद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे वंदे मातरम या गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्या निमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षा तहसीलदार प्रज्ञा भोकरे ह्या होत्या. केंद्र शासनाच्या वतीने प्रत्येक जिल्हास्तर व तालुका स्तरावर वंदे मातरम् ला दीडशे वर्ष झाल्यामुळे कार्यक्रमाचे आयोजन करणे निर्देशित करण्यात आले होते. अशा आशयाचे पत्र शासकीय औद्योगिक व प्रशिक्षण संस्था येथे प्राचार्य यांना प्राप्त झाले.