उदगीर: धोंडी हिप्परगा येथील मृत्यू संशयास्पद, नातेवाईकांचा उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर ठिय्या
Udgir, Latur | Nov 3, 2025 उदगीर तालुक्यातील धोंडी हिप्परगा येथे पुलाच्या पाण्यात एका व्यक्तीचा मृतदेह २ नोव्हेंबर रोजी आढळून आला, सदरील मृतदेह शवविच्छेदना साठी उदगीर येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले मात्र नातेवाईकांनी अपघात की खून असा संशय व्यक्त केलाय मयत बालाजी हिरामण राठोड राहणार बोथी तांडा ता चाकूर हा ऊसतोड मुकादम असून ऊसतोडी कामगारांना पैसे देण्यासाठी कर्नाटक येथे जात होता,त्याच्याकडे उसतोडीचे पैसे असल्याचे नातेवाईकांनी सांगितले असून आम्हाला न्याय द्या म्हणत पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडलाय