यवतमाळ: महाविकास आघाडीत नगराध्यक्ष पदासाठी ओढाताण; यवतमाळमध्ये काँग्रेस आणि शिवसेनेत कुरबुरी
यवतमाळ नगरपालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडी जवळपास निश्चित झाली आहे. मात्र, नगराध्यक्ष पदावरून काँग्रेस तसेच शिवसेनेत (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ओढाताण सुरू असल्याने दोन्ही पक्षांमध्ये कुरबुरी सुरू आहे.