शहरात घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरूच असून, पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी ३ लाख ३३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेख अफसर शेख अफजल राहणार नवीन नगर हे २ जानेवारी रोजी सायंकाळी ५:०० वाजताच्या सुमारास आपल्या घराला कुलूप लावून परिवारासह सासरच्या घरी मुक्कामी गेले होते.