बेसा नगरपंचायतीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवत विरोधकांचा सुपडा साफ केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसला प्रचंड मोठा धक्का बसला असून, त्यांना साधे खातेही उघडता आले नाही. १७ जागांपैकी तब्बल १६ जागांवर विजय मिळवत भाजपने आपली ताकद सिद्ध केली आहे.निवडणुकीच्या निकालात भाजपने सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती. १७ प्रभागांपैकी १६ प्रभागांमध्ये भाजपचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून आले आहेत.