कोरेगाव: एकंबे येथे अज्ञात वाहनाची जोरदार धडकेत १७ वर्षीय तरुण गंभीर जखमी; कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
एकंबे, ता. कोरेगाव येथे २८ नोव्हेंबर रोजी रात्री झालेल्या एका अपघातात १७ वर्षीय तरुणाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक देत गंभीर जखमी केले. या प्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री आठ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोरेगाव पोलीस ठाण्यातून मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता मिळालेल्या माहितीनुसार गणेश महेंद्र चव्हाण वय १७, रा. एकंबे ५९ मायनर, ता. कोरेगाव हे रात्री सुमारे ९ वाजता दुध रतिबासाठी जात असताना जाळीचा ओढा परिसरात पाठीमागून आलेल्या अज्ञात वाहनाने धडक दिली.