अलिबाग: फणसाड वन्यजीव अभयारण्यात १५४ पक्षी प्रजातींची नोंद
Alibag, Raigad | Mar 25, 2026 फणसाड वन्यजीव अभयारण्यात २० ते २२ मार्च दरम्यान झालेला फणसाड बर्ड काउंट २०२६ उपक्रम उत्साहात पार पडला. ग्रीन वर्क्स ट्रस्ट, एसबीआय फाउंडेशन आणि महाराष्ट्र वन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. या उपक्रमात देशभरातील ३७ पक्षीनिरीक्षक, २२ स्वयंसेवक आणि १८ वन कर्मचारी सहभागी झाले होते. त्यांनी १३ पथकांमध्ये विभागून अभयारण्यातील २६ ठिकाणी जाऊन पक्षी आणि इतर प्राण्यांची नोंद केली. जंगल, डोंगर, ओढे अशा विविध भागात पायी फिरून ही गणना करण्यात आली.