आज दिनांक 21 डिसेंबरला सकाळी दहा वाजता पासून नगरपरिषद निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून, यावेळी चांदूरबाजार नगरपरिषद निवडणूकीत प्रहार जनशक्ती पक्षाला बहुमत मिळाले असल्याची माहिती, आज दिनांक 21 डिसेंबरला दुपारी बारा वाजता प्राप्त झाली आहे. नगराध्यक्ष पदाकरिता प्रहार जनशक्ती पक्षाच्या मनीषा मनीष नागलीया यांनी स्पष्ट बहुमत मिळवुन शानदार विजय मिळविला असल्याने, प्रहार जनशक्ती पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसून येत आहे.