गोरेगाव: नगरपंचायत निवडणुकीला घेऊन भाजपच्या दिग्गजांची बंडखोरी, भाजपातील अंतर्गत कलह चव्हाट्यावर,17अपक्ष उमेदवांराचे नामांकन दाखल
ऐन थंडीच्या दिवसातही गोरेगाव नगरपंचायत च्या निवडणुका चांगल्याच तापले असल्याचे चित्र नामांकन दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पाहायला मिळाले.शेवटच्या दिवशी 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत 27 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले.तत्पूर्वी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण 92 उमेदवारांनी आपले नामांकन दाखल केले आहे.यामध्ये 84 नामांकन नगरसेवक पदाचे तर 8 नगराध्यक्ष पदाच्या नामांकनाच्या समावेश आहे.यात 17 अपक्षाने नामांकन उमेदवारी अर्ज दाखल केल्याने गोरेगाव नगरपंचायत निवडणूक चांगलीच रंगणार आहे.