आगामी लोणावळा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सौ. ज्योती दिपक मालपोटे-साळुंखे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आपला उमेदवारी इच्छुक अर्ज दाखल केला आहे. मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुनिल (अण्णा) शेळके, तालुकाध्यक्ष गणेश खांडगे व पक्षश्रेष्ठी यांच्या सूचनेनुसार ही प्रक्रिया पार पडली.