कन्नड: चिंचोली लिंबाजी रस्त्यावर प्रचंड खड्डे — नागरिक चक्क ‘अडचण असल्यास कॉन्ट्रॅक्टरला संपर्क करा’ अशी पाटी घेऊन उभे!
चिंचोली लिंबाजी येथील महावितरण कार्यालयाजवळ रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने वाहनचालक आणि नागरिक त्रस्त झाले आहेत.खड्ड्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला असून संतप्त नागरिकांनी तातेराव भुजंग यांच्यानेतृत्वप्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आगळीवेगळी पद्धत अवलंबली आहे.नागरिकांनी ‘अडचण असल्यास रस्त्याचे कॉन्ट्रॅक्टर गणेश गायकवाड यांच्याशी संपर्क साधा’ अशी पाटी हातात घेऊन रस्त्यावर उभे राहत संताप व्यक्त केला.या घटनेची चर्चा आता संपूर्ण परिसरात रंगली असून प्रशासनाकडून तत्काळ दुरुस्तीची मागणी होत आहे.