माजलगाव: शहरातील जुना मोढा परिसरात चोरट्यांनी तीन दुकाने फोडले
माजलगाव शहरातील जुना मोढा परिसर पुन्हा एकदा चोरट्यांच्या निशाण्यावर आला आहे. शुक्रवार दि 31 ऑक्टोबर रोजी पहाटे 3 च्या सुमारास, दोन किराणा दुकाने, एक मेडिकल आणि एक सिमेंट दुकान फोडण्यात आले.कुलदीप सोळंके यांच्या जय भवानी ट्रेडिंग कंपनी या किराणा दुकानातून चोरट्यांनी १६ हजार रुपये रोख व ५६ हजार रुपयांचा किराणा माल चोरून नेला. तसेच घाईतिडक यांच्या तुळजाभवानी किराणा दुकानाचे शटर तोडले, तर जगदीश मेडिकल फोडण्याचा प्रयत्न झाला.दरम्यान, गेवराई रोडवरील सांडेश्वर ट्रेडिंग सिमेंट दुकानातून तब्बल