घाटंजी: कोळी खुर्द येथे एकाच्या घरून लंपास केला 16 हजार रुपयांचा मुद्देमाल,आरोपी विरुद्ध घाटंजी पोलिसात गुन्हा दाखल
फिर्यादी संदीप जाधव यांच्या तक्रारीनुसार फिर्यादी हे घरामध्ये झोपून असताना आरोपी जीवन चव्हाण याने फिर्यादीच्या घराच्या दरवाजाची कडी काढून घरामध्ये प्रवेश केला व उशीखाली ठेवलेला दहा हजार रुपयांचा मोबाईल व पॉकेट मधील सहा हजार रुपये असा एकूण 16 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.याप्रकरणी घाटंजी पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.