पथ्रोट येथील पेट्रोल पंपाजवळ दिनांक २४ डिसेंबर रोजी दुपारी ४:३० वाजताच्या सुमारास परतवाडा कडून येणाऱ्या दुचाकीला टाटा मॅजिक वाहनाने धडक दिली या धडकेत दुचाकीवरील युवक हा गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला.परवाडा येथून बहिणीला सोडून मोटारसायकलने अंजनगाव सुर्जी येथे घरी परत येत असलेले विशाल देवकर (वय ३८ वर्षे) यांना भरधाव मॅजिक गाडीने जोरदार धडक दिली.ही धडक इतकी भीषण होती की विशाल देवकर यांचा जागीच मृत्यू झाला.