रामटेक: नप रामटेकच्या उपाध्यक्षपदी महायुतीचे आलोक मानकर यांची निवड, तर नलिनी चौधरी, रमेश कारामोरे स्वीकृत सदस्य पदी नियुक्त
नगर परिषद सभागृह, रामटेक येथे शुक्रवार दिनांक 16 जानेवारीला दुपारी तीन वाजताच्या दरम्यान संपन्न रामटेक नगरपरिषद उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीचे आलोक मानकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी काँग्रेसच्या शितल गजभिये यांचा 14 विरुद्ध 7 मतांनी पराभव केला. याचप्रमाणे नामनिर्देशित सदस्य पदी शिवसेनेच्या माजी नगराध्यक्षा नलिनी चौधरी व काँग्रेसचे रमेश कारामोरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तिघांचेही सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.