राज नगर येथील एका पेट्रोल पंप संचालकाच्या बंगल्यात झालेल्या तीन कोटी रुपयांच्या चोरीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी रजनीकांत केशव चानोरे आणि प्रताप गोपाला उरकुडे या दोन आरोपींना अटक केली आहे.चोरीला गेलेल्या मालापैकी ५० टक्के माल पोलिसांनी हस्तगत केला आहे.शुक्रवारी दुपारी आरोपींना न्यायालयात हजर केले असता, त्यांची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे.