गोंदिया: प्रकाश डीएड कॉलेज येथे व्यक्तिमत्व विकास शिबिराचे उदघाटन
ज्ञानउत्कर्ष बहुउद्देशीय शिक्षण संस्था, गोंदिया द्वारा संचालित प्रकाश डी एड कॉलेज येथे दि.08 नोव्हेंबर शनिवार रोजी व्यक्तिमत्व विकास शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी सर्वप्रथम राष्ट्रमाता जिजाऊ तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून प्रतिमांचे पूजन करून शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.व्यक्तिमत्व विकास शिबिर कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.प्रा.दिशा गेडाम कवी साहित्य तशेच समन्वयक संविधान मंत्री संघ गोंदिया यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.