छत्रपती संभाजीनगर : शहरातील वेदांतनगर परिसरात उड्डाणपुलाखाली उभी असलेल्या कारमधून मोबाईल आणि रोकड चोरून नेल्याची घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली. या प्रकरणी १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पोलीस आयुक्तालय तर्फे आज रविवार रात्री आठ वाजता काढण्यात आलेल्या प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.