जागतिक महिला दिनानिमित्त नागपूर मेट्रो रेल कॉर्पोरेशन येथे उपस्थित राहण्याचा सन्मान मिळाला. राजकारणात येण्यापूर्वी याच संस्थेत काम करण्याची संधी मला मिळाली होती, त्यामुळे या ठिकाणाशी माझे विशेष नाते जुळलेले आहे. या भेटीदरम्यान जुन्या सहकाऱ्यांशी भेट झाली आणि अनेक आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला. त्या काळात मिळालेले अनुभव, सहकार्य आणि शिकवण माझ्या आजच्या प्रवासात सतत प्रेरणा देत आहेत महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपली क्षमता सिद्ध केली आहे.