परळी: धनंजय मुंडे यांच्या नाथ्रा गावात गोळीबार
Parli, Beed | Aug 4, 2024 बीड पालकमंत्री तथा कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या परळी तालुक्यातील नाथरा या गावी आर्थिक व्यवहारातून गोळीबार झाल्याची घटना, शनिवार दि.3 ऑगस्ट रोजी दुपारी 2 च्या दरम्यान घडली आहे. या प्रकरणी परळी ग्रामिण पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. नाथरा येथील महादेव मुंडे आणि प्रकाश मुंडे यांच्यात आर्थिक व्यवहारातून गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरु होते. शनिवारी दुपारच्या सुमारास प्रकाश मुंडे यांनी गावठी पिस्तूल मधून हवेत गोळीबार केल्याची घटना घडल्याने खळबळ