आर्णी तालुक्यातील काठोडा येथे महसूल विभागाच्या ई-क्लास जमिनीवर पारधी बेडा येथील समाज बांधव गेल्या काही काळापासून शेती करत होते. मात्र शासनाने ही जमीन सौरऊर्जा प्रकल्पासाठी उपलब्ध करून दिल्याने उभ्या पिकासह जमीन हस्तांतरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर आज संबंधित समाज बांधवांनी या निर्णयाचा कडाडून विरोध केला. जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्ट आदेश असल्याने प्रशासन पोलिस फोर्ससह आज घटनास्थळी पोहोचले. यावेळी शिवसेना (उबाठा) चे जिल्हाप्रमुख प्रवीण शिंदे यांनी प्रशासनाच्या कारवाईला वि