यवतमाळ: ‘पैशाचे नव्हे तर विकासाचे राजकारण करू’ ; अध्यक्ष मनोज गेडाम
नगरपरिषद निवडणुकीची घोषणा होताच राजकीय वातावरण तापले असून विविध पक्ष आणि संघटना मतदारांना आकर्षित करण्यासाठी घोषणांची सरबत्ती करत आहेत. मात्र, या घोषणांपैकी अनेक आश्वासने निवडणुकीनंतर वांझोटी ठरतात, असा अनुभव नागरिकांना वारंवार येतो. याच पार्श्वभूमीवर गुरुदेव युवा संघाने लोकांपुढे एक वेगळा आदर्श ठेवण्याचा संकल्प व्यक्त केला आहे.