दीड वर्षांपासून भूमिगत गटारीचे काम प्रलंबित; त्रस्त नागरिकांचा घरपट्टी व पाणीपट्टी न भरण्याचा एल्गार चाळीसगाव (प्रतिनिधी): पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'स्वच्छ भारत' अभियानाला चाळीसगाव नगरपालिका प्रशासन हरताळ फासत असल्याचे चित्र समोर आले आहे. शहरातील जुने विमानतळ परिसरातील महाराणा प्रताप हाउसिंग सोसायटीमध्ये भूमिगत गटार योजनेचा बोजवारा उडाला असून, गेल्या दीड वर्षांपासून सांडपाणी रस्त्यावर वाहत आहे.