पोलीस आयुक्त यांच्या आदेशानुसार आज नवीन कामठी पोलीस ठाण्यात तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कामठीकरांनी आपल्या तक्रारी पोलिसांसमोर मांडल्या. दरम्यान पोलिसांनी या तक्रारीवर तपास करत लवकरात लवकर सोडविण्याचे आश्वासन देखील दिले. काही तक्रारी ताबडतोब देखील सोडविण्यात आल्या. पोलीस ठाण्यात आयोजित या तक्रार निवारण शिबिराचा मोठ्या प्रमाणात नागरिकांनी लाभ घेतला.