दापोली: निगडी येथे प्राणघातक हल्ला; जखमीला उपचारासाठी हलवळे
मंडणगड तालुक्यातील निगडीगावानजीक मारुती मंदिर जवळ रविवारी रात्री एका व्यक्तीवर लाकडी काठीने प्राण घातक हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात नझीर मुतलीक कोंडेकर वय. ५३ राहणार निगडी मोहल्ला हे गंभीर जखमी झाले असून त्याला पुढील उपचारासाठी मंडणगड रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्याला दुखापत गंभीर झाली असल्याने महाड येथे खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याचे समजते.