जालना शहर महानगरपालिकेत शिवसेना पक्षाच्या वतीने महत्त्वपूर्ण संघटनात्मक निर्णय घेण्यात आला आहे. शुक्रवार दि. 30 जानेवारी 2026 रोजी दुपारी 4 वाजता मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना गटनेतेपदी दीपक रवीशंकर राठोड तर शिवसेना पक्षाच्या प्रतोदपदी दुर्गेश किसनलाल काठोटीवाले यांची अधिकृत निवड करण्यात आली. ही निवड आज छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांसमोर पार पडली. शिवसेना उपनेते अर्जुनराव खोतकर, संपर्कप्रमुख भास्करराव अंबेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे ही निवड करण्यात आली.