धुळे: काळखेडा फाट्याजवळ 'हिट अँड रन': पहाटेच्या वेळी अज्ञात वाहनाच्या धडकेत वृद्धाचा मृत्यू; वाहनचालक फरार
Dhule, Dhule | Nov 29, 2025 धुळे तालुक्यातील फागणे शिवारातील काळखेडा फाट्याजवळ २८ नोव्हेंबर रोजी पहाटे रस्ता ओलांडताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ७० वर्षीय निंबा गंगाराम पाटील यांचा मृत्यू झाला. भरधाव वाहनचालक अपघातानंतर पळून गेला. दत्तू गंगाराम पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड पुढील तपास करत आहेत.