आर्णी: नगर परिषद निवडणुकीत नणंद-भावजयची जोडी विजयी
Arni, Yavatmal | Dec 22, 2025 : नगर परिषद निवडणुकीत प्रभाग क्रंमाक ४ (अ) मधून नणंद निता खुशाल ठाकरे तर प्रभाग क्रंमाक ६ (अ) भावजई अश्विनी संजय राऊत या दोघींनी काँग्रेस पक्षाकडून नगरसेवकपदाची उमेदवारी दाखल केली होती. आज मतमोजणी झाल्यावर या दोघीही भरघोस मतांनी निवडून आल्याने त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आर्णी नगर परिषद निवडणुकीत नणंद-भावजईच्या या जोडीने एकाच पक्षातून वेगवेगळ्या प्रभागातून उमेदवारी दाखल करुन भरघोस मतानी निवडून येण्याचा मान पटकाविला. त्यामुळे ही जोडी शहरात चर्चेचा विषय ठरली आहे.