वणी: महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांनी दाखल केले उमेदवारी अर्ज रंगनाथ स्वामी मंदिरातून काढण्यात आली मिरवणूक
Wani, Yavatmal | Nov 17, 2025 आज नगरपालिका निवडणुकीसाठी नामनिर्देशन सादर करण्याचा शेवटचा दिवस होता. आज सर्वच इच्छुकांनी आपला अर्ज सादर केला. अखेरचा दिवस महाविकास आघाडीसाठी महत्त्वाचा ठरला. आज महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी वाजत गाजत रॅली काढून नामनिर्देशन अर्ज सादर केले. या रॅलीने वणीकरांचे लक्ष वेधले. शिवसेना (उबाठा) तर्फे डॉ. संचिता विजय नगराळे (गेडाम) यांनी नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना (उबाठा) तर्फे फॉर्म भरला. तर महाविकास आघाडीतील पक्षाच्या सर्व प्रभागातील उमेदवारांनी आज नामनिर्देशन पत्र सादर केले