वडवणी: शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात वाहनांची तपासणी
Wadwani, Beed | Nov 12, 2025 वडवणी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, आज बुधवार, दि. १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ वाजता, वाहतूक शाखेकडून वाहनांची कसून तपासणी करण्यात आली. या तपासणीदरम्यान वाहनांचे कागदपत्रे, परवाने आणि नियमांचे पालन होते का याची पाहणी करण्यात आली. निवडणुकीच्या काळात अवैध वाहतूक किंवा अनधिकृत हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती पोलिस प्रशासनाकडून देण्यात आली.