श्रीगोंद्यात ऊसतोडणी टोळीचा शेतकऱ्यांवर जीवघेणा हल्ला; तरुण शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात फिर्याद श्रीगोंदा तालुक्यातील संतवाडी शिवारात ऊसतोडणी टोळीतील व्यक्तींनी शेतकऱ्यांवर ट्रॅक्टर, कोयते, काठ्या व दगडांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना 27 डिसेंबर रोजी सकाळी घडली. या प्रकरणी सारंग शहाजी भोसले (वय 21) यांनी पोलीस ठाण्यात सविस्तर फिर्याद दिली आहे. मिरचीच्या शेतात ट्रॅक्टर घालून नुकसान केल्याचा जाब विचारल्याने वाद विकोपाला गेला.