अमरावती: अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द, 3 ते 18 डिसेंबर, मतदार यादीवर आक्षेप व हरकती नोंदवता येईल
*अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची प्रारुप मतदार यादी प्रसिध्द* *3 ते 18 डिसेंबर, मतदार यादीवर आक्षेप व हरकती नोंदविण्याचा कालावधी* अमरावती, दि. 03 : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघांसाठी दि. 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नवीन मतदार यादी (De-nova Electoral Roll) तयार करण्याचे सुधारित वेळापत्रक भारत निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.